पंचायत राज व्यवस्थेत ग्राम विकास विभागातील जिल्हा परिषद हा अत्यंत महत्वाचा घटक असून शिक्षक हा अत्यंत तळागाळात दैनदिन काम करणारा जनतेला विश्वासपात्र असा शासकीय कर्मचारी आहे. जिल्ह्यातील सर्वच खेड्यापाड्यातील अत्यंत हलाकीच्या परीस्थितीत आपले कर्त्यव्य चोखपणे निभावणे हे शिक्षकाचे ध्येय आहे. अनादी काळापासून शिक्षक ते कार्य मोठ्या कर्त्यव्य तत्परतेने आजही पार पाडतो आहे. त्या शिक्षकच्या कामाची परतफेड होऊच शकत नाही. डा. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी वर्षातील एक दिवस ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. देशातून विविध भागातून देश पातळीवर राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन दरवर्षी शासना तर्फे केले जाते पण मागील तीन वर्षाचा इतिहास लक्षात घेता नागपूर जिल्हा परिषदेत आदर्श शिक्षक पुरस्कार हा वेगवेगळ्या कारणामुळे वादात अडकलेला दिसून येतो कधी तो शिक्षक विरुध्द पदाधिकारी असा असतो तर कधी शिक्षक संघटना विरुद्ध शासन असा असतो तर कधीकधी तर तो व्यक्ती विरुद्ध प्रशासन असा असतो. शिक्षक संपूर्ण वर्षभर आपल्या परी उत्तम व चांगले कार्य करीत असतात. त्याची पावती म्हणून त्यातील काही शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून निवड केली जाते. देश व राज्य पातळीवर पुरस्काराचे नियोजन असते पण जिल्हा पातळीवरील पुरस्कारात काही ना काही तरी अडीअडचणी दरवर्षी येताना दिसतात. ऐन वेळेवर पुरस्कार वितरणाच्या आदल्या रात्री अचानक कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा प्रशासन करते ही अत्यंत खेदाची व चीड आणणारी घटना आहे. जे शिक्षक जीवनाचे उत्तम नियोजन करायला सर्वाना शिकवितात त्यांच्या आदर तिथ्याचे दिवशीच ढिसाळ नियोजन आखून प्रशासन त्यांची थट्टा करते हे अतिशय निंदनीय आहे. कार्यक्रम एखाद्या आचार संहितेच्या नावावर रद्द केला जातो व तो पुढे घेतला जाईल असे तुघलकी फर्मान सोडले जाते. कारण सबळ नसताही बिचारा शिक्षक निमुटपणे सर्व सहन करतो.कारण तो सहनशील आहे संयमी आहे. त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यात कदाचित प्रशासनाला मजा येत असावी. शिक्षकांच्या डझनावारी झालेल्या संघटना व त्यात विखुरला गेलेला शिक्षक निमुटपणे हे सर्व सहन करीत आहे. हे सर्व अनाकलनीय आहे.हक्काचा पुरस्कार गुरुदिनी मिळत नाही व त्यासाठी विचारवंत शिक्षक काहीच ब्र सुद्धा काढत नाहीत हे अतिशय वेदानादाहक आहे. ज्यांना अस्तित्वाचे भान नाही ते उत्तम भविष्य निर्माण करू शकत नाही. राज्यात सर्वत्र जवळपास सर्व जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. सर्वच जिल्ह्यात आचारसंहिता घोषित झालेली आहे. त्या त्या जिल्ह्यात जर शिक्षकांच्या पुरस्कारासाठी आचारसंहिता हा मुद्दा आडवा येत नसेल तर फक्त नागपूर जिल्ह्यात का आडवा येतो याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यात यापेक्षाही एक वेगळे घरभाडे भत्ता हे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजते आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यात शिक्षक बांधवाना वेतन सोबत घरभाडे देय आहे फक्त नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय या मुद्द्यावर घरभाडे भत्ता गोठविण्याचा प्रकार नागपूर जिल्हा परिषदेने मागील ४ महिन्या पासून केलेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सदर निर्णय चुकीचा असल्याचे शिक्षक संघटनच्या प्रतिनिधीना सांगतात. व लवकरच काढला जाईल अशी बोळवण करतात. सामान्य शिक्षक यांनी योग्य तो निर्णय घेण्याची व एकत्र येऊन घरभाडे भत्त्याचे नेमके कारण विचारण्याची ,जाब विचारण्याची वेळ आता आली. एक ना अनेक प्रकरणे जिल्हा परिषद शिक्षकांची अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. जे शिक्षक पोटाला चिमटे घेऊन उज्वल भविष्यासाठी भविष्य निर्वाह निधी साठी मासिक वर्गणी वेतनातून कपात करतात त्यांचे १८ ते २० महिने कपात विवरण व कपात केलेले पैसे जिल्हा परिषद विभागाला जात नाहीत तर पोटाला चिमटे घेऊन अकस्मात मुत्याला सामोरे ज्यान्यासाठी जीवन विमा मासिक वर्गणी वेतनातून कपात करतात त्यांचे १२ ते १५ महिने कपात विवरण व कपात केलेले पैसे जीवन विमा कार्यालयाला जात नाहीत याला दुर्दैव म्हणावे लागेल. कर्जापोटी घेतलेल्या रकमेचे हप्ते २ ते ३ माहिने संबंधित बँकेला पतपेढीला जात नाहीत या पेक्षा शिक्षकाच्या जीवनातील दुसरे काय दुर्दैव असू शकते. या सर्वाना वाचा फोडण्याची वेळ आली आहे. शिक्षकांच्या सहनशीलतेचा आता अंत होत आलेला आहे. शिक्षकांचा बंध आता ज्वालामुखीच्या रुपाने लवकरच उद्रेक रूप घेणार हे कालच ठरवेल.